Isaiah 6

यशयाला झालेले दर्शन आणि पाचारण

1उज्जीया राजा मरण पावला त्या वर्षी मी प्रभूला सिहांसनावर बसलेले पाहीले; तो उंच आणि उंच चढविलेला होता; आणि त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदीर भरून गेले होते. 2त्याच्याबाजूला सराफीम होते; प्रत्येकाला सहा पंख होते; दोहोंनी प्रत्येकजण आपला चेहरा झाकीत; आणि दोहोंनी तो आपले पाय झाकी; आणि दोहोंनी तो उडे.

3प्रत्येकजण दुसऱ्याला हाक मारीत आणि म्हणत, “पवित्र, पवित्र, पवित्र, सेनाधीश परमेश्वर! त्याच्या गौरवाने सर्व पृथ्वी भरून गेली आहे.”

4जे कोणी घोषणा करीत होते त्यांच्या वाणीने दरवाजे व उंबरठे हादरले, आणि मंदिर धुराने भरून गेले.

5तेव्हा मी म्हणालो,
“मला हाय हाय आहे! कारण मी आता मरणार आहे. कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे,
आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो,
कारण माझ्या डोळ्यांनी राजाला, परमेश्वराला, सेनाधीश परमेश्वराला पाहीले आहे.”

6मग सराफीमामधील एक माझ्याकडे उडत आला; त्याच्या हातात एक धगधगीत इंगळ होता, तो त्याने एका चिमट्याने वेदीवरुन उचलला होता. 7त्याने तो माझ्या तोंडाला स्पर्श केले आणि म्हटले,

“बघ, ह्याने तुझ्या ओठांना स्पर्श केला आहे; तुझा दोष काढून टाकण्यात आला आहे आणि तुझ्या पापाची भरपाई झाली आहे.”

8मी प्रभूची वाणी बोलताना ऐकली ती अशी, “मी कोणाला पाठवू; आमच्यासाठी कोण जाईल?” मग मी म्हणालो, “मी येथे आहे; मला पाठव.”

9तो म्हणाला, “जा आणि या लोकांना सांग,
ऐका, पण समजू नका; पाहा, पण ग्रहण करू नका.

10त्यांनी डोळ्यांनी पाहू नये किंवा कानांनी ऐकू नये आणि त्याच्या हृदयाने समजू नये,

आणि मग पुन्हा वळू नये व बरे होऊ नये म्हणून या लोकांचे हृदय कठीण कर, आणि त्यांचे कान बहीरे, आणि डोळे आंधळे कर.”

11तेव्हा मी म्हटले, “प्रभू, असे किती वेळपर्यत?” त्याने उत्तर दिले,

“नगरे चिरडून उध्वस्त आणि रहिवाशांविरहित होईपर्यंत, आणि घरे लोकविरहीत व जमीन उजाड वैराण होईपर्यंत,
12आणि परमेश्वर लोकांना खूप दूर घालवून देईपर्यत आणि देशात एकाकीपण येईपर्यंत.

तेथे दहा टक्के जरी उरले तरी पुन्हा ते नगर नाश होईल.”

तरी एला किंवा अल्लोन ही झाडे तोडल्यावर त्यांचा बुंधा राहतो
त्याच्या बुंध्यात पवित्र बीज आहे.
13

Copyright information for MarULB